Type Here to Get Search Results !

संघर्ष वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना केळी व खाऊचे वाटप

 


निमगाव खैरी : संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या संघर्ष वस्तीगृहास नेवासा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक दीपक रोहिदास चकाले व आरती दीपक चकाले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना केळी व खाऊचे वाटप केले.


विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या शिक्षणाची व दैनंदिन उपक्रमांची माहिती जाणून घेतली. त्यांच्या या प्रेमळ सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.


यावेळी संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा अशोक शिंदे, सचिव अशोक शंकर शिंदे, खजिनदार दीपक शिंदे तसेच संघर्ष वस्तीगृहामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या वृषिका सिद्धार्थ कांबळे मॅडम व सिद्धार्थ साहेबराव कांबळे सर उपस्थित होते.


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी समाजातील व्यक्तींनी दिलेले असे सहकार्य निश्चितच प्रेरणादायी असून, चकाले दाम्पत्याच्या या उपक्रमाबद्दल संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशन व संघर्ष वस्तीगृहाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments