Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धेत संघर्षच्या खेळाडूची उल्लेखनीय कामगिरी; तृतीय क्रमांक पटकावला!



श्रीरामपूर : महाराष्ट्र कराटे असोसिएशनच्या वतीने मुंबई येथील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ४७ व्या महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेत संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या खेळाडू कु. अंजली अशोक कोल्हे हिने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.


राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन करून अंजलीने आपल्या क्रीडागुणांची आणि मेहनतीची छाप उमटवली आहे. तिच्या या यशामुळे असोसिएशनचा नावलौकिक वाढला असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



या यशाबद्दल संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सचिन पवार सर आणि सचिव श्री. अशोक शिंदे सर यांनी अंजलीचे अभिनंदन केले. तसेच भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या.


खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी असोसिएशन सातत्याने प्रयत्नशील आहे.


— संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट्स असोसिएशन

Post a Comment

0 Comments