निमगाव खैरीच्या खेळाडूंचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत डंका; सुवर्णपदकांसह चंदिगड या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !
निमगाव खैरी: प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या राज्यस्तरीय शास्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धेत खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल निमगाव खैरी विद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या शेकडो खेळाडूंना मागे टाकत निमगाव खैरीच्या चमूने स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले.
या चुरशीच्या स्पर्धेत निमगाव खैरीच्या ४४ किलो वजन गटात राहुल कोळी- सुवर्ण पदक ,३५ किलो वजन गटात संदीप जाधव – सुवर्ण पदक , ३४ किलो वजन गटात करण जाधव – सुवर्ण पदक ,३६ किलो वजन गटात रोहन जाधव – सुवर्ण पदक , ४० किलो वजन गटात अजय जाधव- सुवर्ण पदक , ३८ किलो वजन गटात ज्योती जाधव – सुवर्ण पदक , ३३ किलो वजन गटात रवी कोळीव – सुवर्ण पदक व ३० किलो वजन गटात रवि जाधव – कांस्य पदक मिळवून खेळाडूंनी शास्त्रांग मार्शल आर्ट प्रकारांत अप्रतिम कौशल्य दाखवले. स्पर्धेत 7 खेळाडूंनी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले सदर खेळाडुंची चंदीगड येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
हे सर्व खेळाडू संघर्ष वसतिगृह निमगाव खैरी येथील वसतिगृहात राहत असून अतिशय जिद्दी व मेहनती आहेत.सदर खेळाडूंना संघर्ष स्पोर्ट मार्शल आर्ट अँकेडमीचे अध्यक्ष सचिन पवार सर,अशोक शिंदे सर व रेश्मा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेच्या चेअरमन मा.पुष्पलता गोविंदराव आदिक, अध्यक्ष डॉ बबनराव आदिक, सचिव व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.अविनाशजी आदिक, श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा मा.अनुराधाताई आदिक, सहसचिव ॲड.जयंत चौधरी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य मा.नितीन पवार ,मा.हंसराज आदिक,मा.सुनील थोरात मुख्याध्यापक श्री शंकरराव शिंदे सर, उपाध्यक्ष मा.शिवाजीराजे शेजुळ, सर्व सदस्य, ग्रामस्थ,पालक व माजी विद्यार्थी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments