निमगाव खैरी — संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या संघर्ष वस्तीगृह, निमगाव खैरी येथे विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या वस्तीगृहात पहिली ते चौथी पर्यंत जि. प. प्राथमिक शाळा निमगाव खैरी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच पाचवी ते दहावी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल निमगाव खैरी या माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे.
हे वस्तीगृह संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशन अंतर्गत सुरू असून, वस्तीगृहाचे अध्यक्ष रेश्मा शिंदे, सचिव अशोक शिंदे व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.
वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कला व प्रशिक्षणाची सुविधा देण्यात येत आहे.
⭐ उपलब्ध प्रशिक्षण व कला
• वादन कला व संगीत कला
• कराटे प्रशिक्षण
• लाठी-काठी व दांडपट्टा प्रशिक्षण
• नृत्य व नाटक प्रशिक्षण
• गायन कला
• लेझीम झांज पथक कवायत परेड इत्यादी
गरजू व होतकरू विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments