Type Here to Get Search Results !

खैरी निमगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; संघर्ष वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग

खैरी निमगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; संघर्ष वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग


ता. श्रीरामपूर :

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा खैरी निमगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम २०२६ मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम सोमवार दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाघाई माता मंदिर, खैरी निमगाव येथे पार पडला.

या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे संघर्ष वस्तीगृह, निमगाव खैरी येथील विद्यार्थ्यांनी देखील या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेत विविध प्रकारचे आकर्षक डान्स सादर केले. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट छावा त्यामधील मुख्य रोल करण जाधव यांनी केला.



संघर्ष वस्तीगृह निमगाव खैरी येथील विद्यार्थी छावा  चित्रपट मधील छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करताना करण भानुदास जाधव.

 तसेच विद्यार्थी कलाकारांची नाव पुढील प्रमाणे १)नितीन पप्पू जाधव 

२)योगेश पप्पू जाधव 

३)राजेश युवराज कोळी 

४)रवी युवराज कोळी 

५)राहुल जितेंद्र कोळी

६)लखन सागर जाधव

७)मीनाक्षी विजय बंडीधनगर 

८)करण भानुदास जाधव 

९)समीर धर्मा जाधव 

१०)वैष्णवी प्रकाश जाधव 

११)अनुष्का अनिल कोळी 

१२)रवी सुरेश जाधव 

१३) विजय रावसाहेब जाधव

१४)अजय रावसाहेब जाधव

१५)विजय अनिल शिंदे 

१६)रोहन उत्तम जाधव 

१७)कृष्णा सुनील जाधव 

१८) संदीप सुरेश जाधव

 यांनी केला त्यांच्या दमदार नृत्य सादरीकरणामुळे उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला आणि कार्यक्रमाला रंगत आली.

         
      संघर्ष वस्तीग्रह निमगाव खैरी मधील विद्यार्थ्यांचा फोटो

विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना आणि आता झालेल्या कराटे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये संघर्ष वस्तीगृहाचे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकली. संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशनचे अध्यक्ष रेश्मा शिंदे सचिव अशोक शिंदे सल्लागार एडवोकेट सायली जगताप खजिनदार दीपक शिंदे.उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली कला, आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत.असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. संघर्ष स्पोर्ट्स मिक्स मार्शल आर्ट्स चे अध्यक्ष सचिन पवार सर आणि

या कार्यक्रमासाठी जि.प.प्राथमीक शाळा निमगाव खैरी शाळेचे मुख्याध्यापक वाघूजी पठारे सर व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, पालक संघ, सखी सावित्री संघ, ग्रामपंचायत पदाधिकारी, वाघाई माता मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले. 

Post a Comment

0 Comments