Type Here to Get Search Results !

स्वार्थाच्या युगात निस्वार्थीचा मदतीचा प्रकाश ना फोटो ना नाव फक्त मदत व गुप्तदान मोठा आधार आणि नाव प्रसिद्धी नको फक्त संघर्ष वस्तीगृहामधील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवा...

 स्वार्थाच्या युगात निस्वार्थीचा मदतीचा प्रकाश ना फोटो ना नाव फक्त मदत व गुप्तदान मोठा आधार आणि नाव प्रसिद्धी नको फक्त संघर्ष  वस्तीगृहामधील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवा...

निमगाव खैरी येथील संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या संघर्ष वस्ती गृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज एक प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारी घटना घडली.

  समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे, याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे.

एका उदार मनाच्या साहेबांनी कोणतीही प्रसिद्धी, नाव किंवा अपेक्षा न ठेवता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व सुविधा वाढवण्यासाठी महत्त्वाची मदत केली. वस्ती गृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. त्याचबरोबर लाईट इन्व्हर्टर देण्यात आला, ज्यामुळे वीज नसतानाही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कंपास बॉक्स देऊन त्यांच्या शैक्षणिक गरजांची ही काळजी घेतली. 

विशेष म्हणजे, ही मदत करताना त्या साहेबांनी एकच अट ठेवली – "माझे नाव घेऊ नका, फोटोही काढू नका. ही मदत फक्त मुलांसाठी आहे." अशा शब्दांत त्यांनी आपल्या निःस्वार्थ भावनेची जाणीव करून दिली.मदत करूनही कुठलाही गाजावाजा न करता, केवळ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी हे कार्य केले.

आजच्या काळात जिथे काही ठिकाणी कामासाठी मतदान किंवा पैशांची अपेक्षा केली जाते, तिथे या साहेबांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता दोन्ही हातांनी मदत केली. त्यामुळे त्यांचे हे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे.

संघर्ष वस्तीगृहाच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देताना असेच सांगावेसे वाटते –

"साहेब, तुम्ही केलेली ही मदत आम्ही कधीही विसरणार नाही. तुमच्या या माणुसकीच्या कार्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. संघर्ष वस्तीगृह तुमचे सदैव आभारी राहील." 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या या वसतिगृहात जि.प.प्राथमिक शाळा निमगाव खैरी येथील मुख्याध्यापक वाघुजी पटारे सर तसेच न्यू इंग्लिश स्कूल निमगाव खैरी या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शंकरराव शिंदे सर जि.प.प्राथमीक शाळा चांगदेव नगरचे गोविंद जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

या उपक्रमात संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशनच्या मॅडम रेश्मा शिंदे (अध्यक्षा),दीपक शिंदे (खजिनदार),अशोक शिंदे (सचिव) व मार्गदर्शक सचिन पवार सर तसेच महेश धानापूणे सर तसेच या विद्यार्थ्यांना ट्युशन शिकवण्यासाठी वैष्णवी इंगळे व आरती शिंदे ह्या सहकार्य करत असतात.सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष वसतिगृहाचे कार्य सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दिलेली ही मदत म्हणजे समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठा आधार ठरणार आहे.


अशा निःस्वार्थी व्यक्तींच्या मदतीमुळेच समाजात आशेचा किरण जिवंत राहतो, आणि विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची नवी उर्जा मिळते.

Post a Comment

0 Comments