संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या वतीने दि. 9 मे ते 11 मे दरम्यान उन्हाळी कराटे कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना कराटेसह लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक, रायफल शूटिंग तसेच ब्लॅक बेल्ट परीक्षा प्रशिक्षण अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कॅम्पमध्ये एकूण 35 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून त्यापैकी 4 विद्यार्थी ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी सहभागी झाले होते. श्रीरामपूर तालुका, राहता तालुका आणि श्रीगोंदा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला.
ज्ञानअंकुर इंग्लिश मीडियम स्कूल, पेडगाव यांच्या सहकार्याने हा कॅम्प यशस्वीरित्या पार पडला. शाळेच्या प्रिन्सिपल पल्लवी पानसरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच संस्थापक नागनाथ पानसरे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.
या कॅम्पसाठी कराटे सेन्सई शब्बीर पठाण, सेन्सई युवराज पवार आणि सेन्सई सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची भावना निर्माण करण्यासाठी हा कॅम्प अत्यंत उपयुक्त ठरला. हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक अशोक शिंदे सर आणि अमोल माळी सर महिला प्रशिक्षिका रेश्मा शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment
0 Comments