Type Here to Get Search Results !

दौंड तालुका अध्यक्षपदी मिथुन शंकर शिंदे यांची निवड

 


दौंड : वडगाव दरेकर येथील सुप्रसिद्ध ललकार बँड, बँजो अँड डीजेचे मालक मिथुन शंकर शिंदे यांची दौंड तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून वडगाव दरेकर येथे ललकार बँड, बँजो अँड डीजेच्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट सेवा देत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये दर्जेदार सेवा देऊन त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची दौंड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे बँड व डीजे व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी मिथुन शिंदे यांनी आपल्या निवडीबद्दल सर्वांचे आभार मानत, "माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सर्वांना सोबत घेऊन काम करेन," असा विश्वास व्यक्त केला.

मिथुन शंकर शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments