Type Here to Get Search Results !

संघर्ष वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मायेचा हात; शिक्षक जनार्दन चिंतामन ठुबे यांची आर्थिक मदत



संघर्ष वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मायेचा हात; शिक्षक जनार्दन चिंतामन ठुबे यांची आर्थिक मदत

निमगाव खैरी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक श्री. जनार्दन चिंतामन ठुबे यांनी आज संघर्ष वस्तीगृहाला सदिच्छा भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांची प्रेमाने भेट घेतली. विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांनी त्यांच्या शिक्षणाची व दैनंदिन गरजांची विचारपूस केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी त्यांनी आर्थिक मदत करून समाजाप्रती असलेली आपली संवेदनशीलता आणि सेवाभाव जपला.

या छोट्याशा मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. अशा सहकार्यामुळे मुलांना केवळ आर्थिक आधारच नव्हे, तर समाज आपल्या पाठीशी उभा आहे, हा आत्मविश्वासही मिळतो.

यावेळी संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रेश्मा अशोक शिंदे व सचिव श्री. अशोक शंकर शिंदे यांनी श्री. जनार्दन चिंतामन ठुबे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशनच्या वतीने समाजातील दानशूर व्यक्तींनी अशाच प्रकारे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments