संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशन संचलित संघर्ष वस्तीगृह, निमगाव खैरी येथील विद्यार्थ्यांसाठी सौ. दिव्या वाघ यांनी प्रेमाने खाऊ आणून विद्यार्थ्यांना वाटप केले.
त्यांच्या या छोट्याशा पण मायेने भरलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. गरजू विद्यार्थ्यांप्रती दाखविलेली ही आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी असून, अशा सेवाभावी व्यक्तींमुळे विद्यार्थ्यांना प्रेम, आधार आणि जिव्हाळ्याची भावना मिळते.
यावेळी संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा अशोक शिंदे, सचिव अशोक शंकर शिंदे, खजिनदार दीपक शिंदे तसेच शिक्षिका वृषिका सिद्धार्थ कांबळे यांनी सौ. दिव्या वाघ यांचे अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल मनःपूर्वक कौतुक केले. तसेच भविष्यातही असेच समाजोपयोगी कार्य सुरू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशन व संघर्ष वस्तीगृहाच्या वतीने सौ. दिव्या वाघ यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment
0 Comments