अशोक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मुलींसाठी आत्मसंरक्षण व सशक्तिकरण शिबिराचे आयोजन .... प्रगती नगर -येथील अशोक इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि लिनेस् क्लब श्रीरामपूर यांचे संयुक्त विद्यमाने मुलीसाठी सेल्फ डिफेन्स व सेक्युरिटी याविषयी शिबिराच्या आयोजन, मान. माजी आमदार भानुदास मुरकुटे साहेब, चेअरमन अशोक सहकारी साखर कारखाना यांच्या संकल्पनेतून व मान. मंजुश्रीताई मुरकुटे को-ओर्डिंनेटर अशोक ग्रुप ऑफ स्कूल्स व सभापती महिला व बालकल्याण समिती नगरपालिका श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक २० जुलै 2026 ते शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 अखेर करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन नुकतेच लिनेस् क्लब श्रीरामपूरच्या अध्यक्षा मान. डॉ. मीनल फुलवर मॅडम व मान. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी डॉ. फुलवर मॅडम यांनी लिनेस क्लबच्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली व महिला सबलीकरण चे कार्य हाती घेतल्याचे स्पष्ट करून मान. मंजुश्री ताई यांचे सहकार्य लाभत असते, या ठिकाणी शिबिराचे आयोजन त्यांच्या आग्रहामुळे घेतल्याचे स्पष्ट केले. या शिबिरासाठी ट्रेनर म्हणून संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशनचे अध्यक्षा मान. रेश्मा शिंदे व सेक्रेटरी मान. अशोक शिंदे यांनी विद्यार्थिनींना कराटे व मार्शल आर्ट चे प्रशिक्षण दिले. अध्यक्षीय भाषणात मान.मंजुश्री ताई यांनी विद्यार्थिनींनी दाखवलेले कराटे व मार्शल आर्ट डेमो याची कौतुक केले व शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य श्री संपत देसाई यांनी केले. तर आभार मोनी गोंडे यांनी मांनले. सूत्रसंचालन नीतू गायकवाड यांनी केले.याप्रसंगी क्लबच्या सेक्रेटरी माधुरी सोनवणे,खजिनदार श्रद्धा मिरीकर व इतर सदस्य दीप्ती दहिवाळ, दीप्ती डोशी , डंबीर मॅडम व निलेश साठे हे उपस्थित होते याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी वृंद कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments