Type Here to Get Search Results !

🇮🇳 देशभक्तीचा जल्लोष! गोंडेगावच्या PM श्री शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात 🇮🇳

 


गोंडेगाव (प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

           प्रथम गावात प्रभात फेरी काढण्यात आली . त्यात लेझीम नृत्य व मुलांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला त्यानंतर शाळेत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पोखरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . यावेळी गावचे सरपंच सागर बढे ,उपसरपंच रवींद्र आमले ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वरी ताई ढगे , माध्यमिक विद्याल  मुख्यध्यापिका सुनिता गायकवाड ,नेते शंतनू फोपसे ,अमोल तांबे, माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष एकनाथ गुलदगड, ग्राम महसूल अधिकारी खैरनार भाऊसाहेब, माजी अध्यक्ष अनिल कदम, विजय कासार ,तंटामुक्तीचे अध्यक्ष रावसाहेब पोखरे, नवनाथ वाघमारे, बापू बडाख ,किरण म्हैस, मोसिम सय्यद, राजेंद्र थोरात, संतोष दिवटे, शिवनाथ फोपसे अविनाश दिवटे कृष्णा बढे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . 




        यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शानदार परेड सादर करून ध्वजास सलामी दिली लहान लहान मुलांनी भाषण सादर करून उपस्थित पाहुणे व पालकांची दाद मिळवली . तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मॉ तुझे सलाम या गीतावर योगा नृत्य सादर करून सर्वांची शाब्बासकी मिळवली . नंतर संगीत कवायत सादर करण्यात आली . शाळेत रांगोळी स्पर्धा , निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा , घेण्यात आल्या . त्यामध्ये विशेष निवड झालेल्या विद्यार्थ्याना व विविध गुण प्रदर्शनात गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले . तसेच पी एम श्री अंतर्गत आलेल्या खेळण्याचे साहित्य व सगणंक लॅब मध्ये बसविलेल्या ए.सी चे उट्घाटन यावेळी करण्यात आले . मिशन आपुलकी उपक्रम या अंतर्गत गावातील अरविंद दादा फोपसे व गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका अरुंधती फोपसे यांनी स्व चि अक्षय अरविंद फोपसे यांच्या स्मरणार्थ शाळेस पाच हजार रुपये देणगी दिली.यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली सोनवणे, श्री राजेंद्र पंडित, श्री. गायकवाड, श्री. निर्मळ, श्री. बनकर, श्री. पवार, श्री. पंडित, श्री. तुपे, श्री. अशोक शिंदे, श्री. दीपक वाघ, सौ. तांबोळी, सौ. शेख, सौ. पवार, सौ. 

भोसले, सौ. पाचारणे, सौ. ऐश्वर्या तुपे, सौ. पटेल, सौ. लोहार, सौ. क्रांती थोरात,  शालेय सहाय्यक श्री. दत्तात्रय थोरात तसेच विद्यार्थी, माध्यमिक विद्यालय शिक्षक, आरोग्य सेवक , आशा सेविका , अंगणवाडी सेविका ,पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         ग्रामपंचायत कार्यालय येथे उपसरपंच प्रदीप जगताप व अनिल कुऱ्हाडे गोंडेगाव माध्यमिक विद्यालय येथे सरपंच सागर बढे तर सिताराम थोरात नॅचलर स्कुल येथे गोंडेगावचे रहिवाशी व अहिल्यानगर येथील प्रसिद्ध उद्योजक राहूल फटांगरे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले .

Post a Comment

0 Comments