Type Here to Get Search Results !

वाढदिवसाचा आनंद स्वतःसाठी नाही, गरजू विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी!

 सामाजिक आणि दानशूर कार्यकर्ते सागरभाऊ चवांडके यांची संघर्ष वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना ₹११ हजारांची शैक्षणिक मदत

“वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ₹११ हजारांची मदत करणारे सामाजिक दानशूर कार्यकर्ते सागरभाऊ चवांडके यांचा संघर्ष वस्तीगृहाच्या वतीने सन्मान करताना अध्यक्षा सौ. रेश्मा अशोक शिंदे, सचिव श्री. अशोक शंकर शिंदे, शिक्षक व उपस्थित मान्यवर.”



निमगाव खैरी :

आजच्या काळात वाढदिवस साजरा करताना मोठमोठ्या पार्ट्या, अनावश्यक खर्च आणि दिखावा करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र आपल्या वाढदिवसाचा आनंद एका गरजू विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचे हास्य बनवणारे दातृत्व दाखवत अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सागरभाऊ चवांडके यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.


आपल्या वाढदिवसानिमित्त सागरभाऊ चवांडके यांनी संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशन संचलित संघर्ष वस्तीगृह, निमगाव खैरी येथील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ₹११,०००/- (अकरा हजार रुपये) आर्थिक मदत दिली.


या मदतीतून विद्यार्थ्यांसाठी दप्तर, वह्या, वाचनासाठी पुस्तके तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य घेण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे एखाद्या मुलाच्या हातातील पुस्तक सुटू नये, त्याचे शिक्षण थांबू नये आणि त्याच्या डोळ्यातील मोठे स्वप्न परिस्थितीसमोर हरू नये, या भावनेतून करण्यात आलेली ही मदत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाची ठरली आहे.


“वाढदिवसाच्या खर्चापेक्षा एखाद्या मुलाचे भविष्य घडवणे महत्त्वाचे!”


सागरभाऊ चवांडके यांनी केलेले हे दातृत्व केवळ ₹११ हजारांची मदत नाही, तर संघर्ष वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिलेले आशेचे बळ आहे. एका गरजू मुलाच्या हातात दप्तर देणे, त्याला वही-पुस्तक उपलब्ध करून देणे म्हणजे त्याला शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जाण्यासाठी एक नवी संधी देणे होय.


संघर्ष वस्तीगृहामध्ये विविध परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य केले जात आहे. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजातील दानशूर व्यक्तींनी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.


या सामाजिक योगदानाबद्दल सागरभाऊ चवांडके यांचा वाढदिवसानिमित्त संघर्ष वस्तीगृहाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

 यावेळी भाऊंचा सत्कार करताना कार्यक्रमास श्री. बाळासाहेब बनकर सर, आणि श्री. संदीप असने सर, श्री. मंगेश लोहकरे सर, श्री. प्रकाश मच्छा सर, श्री. सचिन बोगा सर, श्री. ओम चवांडके सर, श्री. हेमंत कदम सर, श्री. मच्छिंद्र थोरात सर आदी मान्यवर उपस्थित होते.


संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रेश्मा अशोक शिंदे, सचिव श्री. अशोक शंकर शिंदे तसेच वस्तीगृहाचे शिक्षक होते.


सागरभाऊ चवांडके यांच्या या दातृत्वामुळे “शिक्षणासाठी मदतीचा हात, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साथ” हा संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि अनुकरणीय उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशन संघर्ष वस्तीगृह, निमगाव खैरी 



Post a Comment

0 Comments