Type Here to Get Search Results !

आमदार चषक जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत संघर्ष स्पोर्ट्सच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

 


अहिल्यानगर : अहमदनगर अर्बन अँड रुरल कराटे-डो असोसिएशन, अ.नगर यांच्या वतीने आमदार चषक जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा २०२६ रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी आनंद विद्यालय, गुलमोहर रोड, अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडली.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन तसेच महाराष्ट्र कराटे असोसिएशन (MKA) यांच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत सब-ज्युनिअर, कॅडेट व ज्युनिअर मुले-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत संघर्ष स्पोर्ट्स मिक्स मार्शल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. सब-ज्युनिअर गटात अस्मी शिंदे, अंजली कोल्हे, दीपक शिंदे, कृष्णराज वाणी आणि रुद्र उखांडे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकांची कमाई केली.

तर सिनिअर गटात प्रशिक्षक अशोक शिंदे यांनी सुवर्णपदक पटकावत विशेष कामगिरी केली. तसेच अभिजीत चकले, अधिराज आरंडे आणि आनंद सुरळकर यांनी कॅंडिडेट गटात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदके मिळवली.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अशोक शिंदे यांचे विशेष प्रशिक्षण व सुधाकर शिंदे व दीपक चकले यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच संघर्ष स्पोर्ट्स मिक्स मार्शल आर्ट्सचे मार्गदर्शक व अध्यक्ष सचिन पवार सर यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना स्पर्धेची उत्तम तयारी करता आली.

स्पर्धेच्या आयोजनात जयसिंग काळे अध्यक्ष, अमोल काजळे सचिव, रोहित काळे आयोजक आणि कार्तिक गिते खजिनदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आ. संग्रामभैय्या जगताप यांची उपस्थिती होती.

संघर्ष स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल प्रशिक्षक, अध्यक्ष, पालक व क्रीडाप्रेमींनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. या यशामुळे संघर्ष स्पोर्ट्स मिक्स मार्शल आर्ट्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments