महाराष्ट्र राज्य बँजो, बँड असोसिएशनच्या दौंड तालुका अध्यक्षपदी मिथुन शंकर शिंदे यांची नियुक्ती
दौंड, दि. २५ जून : वडगाव दरेकर येथील ललकार बँड, बँजो अँड डीजेचे मालक मिथुन शंकर शिंदे यांची महाराष्ट्र राज्य बँजो, बँड असोसिएशनच्या दौंड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र असोसिएशनच्या वतीने प्रदान करण्यात आले असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
मिथुन शिंदे हे गेल्या दहा वर्षांपासून वडगाव दरेकर येथे ललकार बँड, बँजो अँड डीजेच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देत आहेत. त्यांच्या प्रामाणिक कार्याची, सामाजिक सहभागाची व व्यावसायिक अनुभवाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर महाराष्ट्र राज्य बँजो, बँड असोसिएशनच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील बँड, बँजो व डीजे व्यावसायिकांचे प्रश्न सोडविणे, त्यांचे संघटन बळकट करणे आणि त्यांच्या हितासाठी कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments