Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना प्रेरणेची साथ; सरपंच दत्तू पाटील झुरळे यांची संघर्ष वस्तीगृहाला सदिच्छा भेट

 


निमगाव खैरी : संघर्ष वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या भावनेतून गावचे ज्येष्ठ नागरिक तथा सरपंच श्री. दत्तू झुरळे पाटील यांनी संघर्ष वस्तीगृहाला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, राहण्याची, जेवणाची तसेच वस्तीगृहातील दैनंदिन उपक्रमांची आपुलकीने विचारपूस केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाबरोबरच खेळ, शिस्त, संस्कार आणि चांगल्या सवयी अंगीकारण्याचे मार्गदर्शन केले.

विशेष म्हणजे, संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष सौ. रेश्मा अशोक शिंदे, सचिव श्री. अशोक शंकर शिंदे, कांबळे सर व मॅडम तसेच गावातील तरस साहेब आणि वाघ साहेब कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सरपंच श्री. दत्तू झुरळे पाटील यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

सरपंच साहेबांनी विद्यार्थ्यांशी अगदी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मोठ्या माणसांनी दिलेला आधार, प्रेमाचे दोन शब्द आणि प्रोत्साहनाची थाप हीच मुलांसाठी मोठी प्रेरणा असते. या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनात नव्या उमेदेची भावना निर्माण झाली.

यावेळी संघर्ष बहुउद्देशीय फाउंडेशनचे पदाधिकारी, कांबळे सर-मॅडम, गावातील कार्यकर्ते व संघर्ष वस्तीगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments